सागर चव्हाण यांच्याकडे पुन्हा कोकणसादची सूत्रे


सागर चव्हाण यांच्याकडे पुन्हा कोकणसादची सूत्रे

साद पुन्हा नव्या पर्वाची..!

कोकणच्या मातीचा सुगंध जपत, जनतेच्या प्रश्नांना आवाज देत आणि समाजातील प्रत्येक घटकाशी सुसंवाद साधत ‘कोकणसाद’ने गेल्या काही वर्षांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ‘कोकणसाद’ हा केवळ एक माध्यम नाही, तर कोकणवासीयांचा विश्वासार्ह साथीदार आणि प्रभावी व्यासपीठ बनला आहे.

या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासू दृष्टिकोन आणि दर्जेदार कंटेंट देण्याची जिद्द आहे. राजकारण, संस्कृती, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा समतोल राखत समाजाला दिशा देणारा आशय निर्माण करण्यावर ‘कोकणसाद’ने नेहमी भर दिला. असा आशय, ज्यामुळे संबंधित यंत्रणेलाही विचार करावा लागतो—हीच ‘कोकणसाद’ची खरी ताकद ठरली आहे.

याच पार्श्वभूमीवर, सागर चव्हाण यांनी पुन्हा एकदा ‘कोकणसाद LIVE’ आणि दैनिक ‘कोकणसाद’च्या मुख्य संपादकपदाची धुरा स्वीकारली आहे. ही केवळ जबाबदारी नसून नव्या पर्वाची सुरुवात आहे. नव्या आत्मविश्वासाने आणि सक्षम टीमच्या बळावर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

“कोकणसाद LIVE” आणि दैनिक “कोकणसाद” हे कोकणवासीयांचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून जिल्ह्याच्या जडणघडणीत अग्रस्थानी राहून आवश्यक ते योगदान देणे, हेच आमचे ध्येय आहे,” असे सागर चव्हाण यांनी स्पष्ट केले.

कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नवे विचार, नवे उपक्रम आणि जनतेशी अधिक जवळीक साधत ‘कोकणसाद’ आता नव्या उंची गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.