महाराष्ट्रातले प्रत्येक पर्यटनस्थळ हे त्याच्या भौगोलिक सौंदर्यामुळे नेहमीच खुलून दिसते. पण या पर्यटनस्थळांच्या यादीत ज्या वेळी आंबोलीचे नाव उच्चारलं जाते देहाची अवस्था ही शब्दातीत होते. आंबोली आठवणे म्हणजे आंबोली पाहणे, आंबोली पाहणे म्हणजे आंबोली जगणे आणि आणि एकदा का तुम्ही आंबोली जगायला सुरुवात केली की देहाने कुठेही जगते ते केवळ आंबोलीचे होऊन ! आंबोलीच्या धबधब्यासमोर स्वतःला सावरायचे की हिरण्यकेशीच्या डोहात स्वतःला उमलायचे हा फक्त शब्दांचा खेळ नाहीय, तो जगण्याचा कस्तुरीमोह.. प्रत्येक वेळी पावसात, थंड गार गारव्यात, किंवा तळपत्या उन्हाला थंड वाऱ्यात लपेटून आंबोली तुम्हाला हसवत राहते!
आणि याच आंबोलीच्या प्रवासात महादेव भिसे नावाचा एक माणूस भेटला ना की हा सगळा हिरवा आसमंत तुमच्याशी त्याची गोष्ट सांगू लागतो. कदाचित पूर्ण आंबोलीत महादेव भिसे कुठे राहतात हे विचारल्यावर अनेकांना ठाऊकही नसेल, पण आंबोलीच्या जंगलात तुम्हाला अनोळखी वाटांवर जो माणूस भेटेल त्याचे नाव असेल 'काका भिसे'!
महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणची राणी असे जे आंबोलीचे वर्णन करतात, आंबोली त्या पल्याड एक मोठी जगण्याची सफर आहे. ब्रिटिश काळात कर्नल वेस्ट्रॉप पासून ते आजतागायत आंबोली प्रत्येकाला श्रीमंत करते. निसर्ग संपदा आणि वन्य संपदेच्या अभ्यासकाच्या कुतुहलात काका भिसे नेहमीच वाटाड्या असतात.. पण ना या सगळ्यात तुम्ही आंबोलीला घरी आणू शकता ना इथल्या वन्य संपदेला!
नेमकी हीच गोष्ट हेरून काका भिसे यांनी 'पगमार्क आर्ट गॅलरी'च्या माध्यमातून म्युरलसची निर्मिती केलीय. मायक्रो फायबरच्या सहाय्याने निर्माण केलेल्या या म्युरल म्हणजे जिवंतपणाची आपलीआपली गोष्ट आहे!
मलबार ग्लायडिंग फ्रॉग malbar gliding frog हा बेडकाचा प्रकार म्हणजे पश्चिम घाट आणि त्यातही आंबोलीतील एक अनोखा नजारा आहे. एरवी बेडकाच्या खरेपणाकडे पाहणे म्हणजे दिव्यच ! पण म्युरलच्या निमित्ताने हा रंगांचा मिलाफ जिवंत होतो.
आकर्षक मांडणी, सुंदर रंगकाम यासोबतच पगमार्कने प्रत्येक खोक्यावर त्या म्युरलमधल्या वन्यजीवांची जी माहिती दिलीय त्यामुळे ही म्युरल खेळणी न राहता तो एक अभ्यास किंवा ऑफिस डेकोरेट करताना एक वेगळाच क्लासिक शोपीस बनतो.
अतिशय ऐटीत उभा असलेला हा लेसर फ्लेमिंगो lesser flemingo. एरवी मुंबईकर पाहुमा अशी ओळख असणारा भगवा आणि लाल रंगछटेमुळा पांढरा असूनही तो मस्त रंगीत भासतो !
वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अदभुत सफरीत या म्युरल पाहताना आंबोलीची आठवण कायम जिवंत राहते. वाघापासून ते गौरपर्यंत सगळं सगळी मायक्रो म्युरल वर्क कमाल आहे.
काका भिसे यांची जरी ही कलात्मकता असली तरी भिसे मूळचे पर्यावरण रक्षकपणाची जबाबदारी काका अभिमानाने आणि नव्या ऊर्जेने सांभाळत आहेत.
सच्चा वन्यप्रेमी असणारा हा माणूस ज्या तळमळीने आंबोलीसाठी झटतोय त्याला खरंच तोड नाही. पण आंबोली जपताना ती मांडलीच पाहिजे, आणि मांडून ती पुन्हा जगवलीच पाहिजे या ध्यासातून काका भिसे नेहमीच आपली वेगळी ओळख मांडतात. त्याच्या या पर्यावरण रक्षकांच्या भूमिकेमुळेच त्यांना मानद वन्य रक्षक हा शासकिय सन्मान प्राप्त झालाय.
आंबोलीच्या गच्च झुडुपात लपलेली, आणि या वनसंपदेने जपलेली ही पशूप्राण्यांच्या अदभुत सफर तुम्हाला तुम्हाला जंगलाचा निवांतपणा काही क्षणासाठी का होईना पण तुम्हाला प्रेरक बनवतात. खरंतर बाजारपेठेचा विचार करताना त्याचे निकष अत्यंत कलात्मक पद्धतीमध्ये मांडताना त्यात निसर्ग त्या खोक्यामधून प्रत्येकाच्या घरामध्ये ऑफिसमध्ये यायला आता सज्ज झालाय. पगमार्क आर्ट गॅलरीचे हे म्युरल कलेक्शन सोशल मीडियावरही चांगलेच ट्रेंड होतेय !
काका भिसे यांचा हा म्युरल मधून आंबोली मांडण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. ही म्युरल महाराष्ट्रात नाही तर अवघ्या जगभरातल्या पर्यटक आणि वन्य अभ्यासकांची घरी कार्यालयात एक नवी आंबोली वसवणार आहे. आज या क्षेत्रात 'हॅम्ले' ची ओळख मोठी आहे..त्या पातळीवर हे म्युरल टॉय म्हणून जाण्याची गरज आहे. काकांचे आंबोलीत लाकडी खेळण्यांचेही एक छोटे दुकान आहे. त्या दुकानात हे मिळतेच पण आता जगभरही ऑनलाइन डिलिव्हरी सुरू झालीय. आंबोलीची ही विशाल दुनिया मायक्रो फायबरमुळे आता घराघरात पोहोचणार आहे.. बायोडायव्हर्सिटीचे मायक्रो रूप आजच्या पिढीला पर्यटक नाही तर अभ्यासक बनवेल !
फोटोग्राफर असणारे काका त्यांच्या फोटोतून जो निसर्ग सांगतात ती लेन्स जरी तुमच्याकडे असली तरी, तुम्ही तसे टिपू नाही शकत.. पण ज्या दिवशी ज्या नजरेने काका आंबोली बघतात तो 'चष्मा' तुम्हाला मिळाला, की तुम्ही आंबोली बघायला शिकाल..
@सिंधुदुर्ग360°
---
म्युरल हव्या असल्यास संपर्क
Kaka Bhise
+917588447161
Raman Kulkarni
+919822674822
मस्तच ऋषी दा
ReplyDeleteजबरदस्त!!
ReplyDelete