एक विद्याभूमी साकारताना

भारताचे उपराष्ट्रपती मा.श्री.व्यंकप्पा नायडू यांच्या शुभहस्ते कोकणचे सुपुत्र तसेच रिशिवूड युनिव्हर्सिटीचे कुलगुरू श्री.सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत रिशिवूड युनिव्हर्सिटीच्या भव्य-दिव्य अश्या भारतातील सर्वोत्कृष्ट विद्येच्या उच्चतम दालनाचा अर्थात रिशिवूड युनिव्हर्सिटीचा शुभारंभ संपन्न झाला .


दिल्ली जवळील सोनिपत येथे भारतातील अतिशय भव्यदिव्य अशी रिशवुड युनिव्हर्सिटी निर्माण झाली असून, कोकणाला अभिमान वाटावा असे कोकणचे सुपुत्र श्री.सुरेश प्रभू हे या युनिव्हर्सिटीचे कुलगुरु पद भूषवत आहेत.


भारताचे उपराष्ट्रपती श्री.व्यंकप्पा नायडू यांच्या शुभहस्ते दिल्ली येथे विज्ञान भवनातील भव्यदिव्य कार्यक्रमात रिशिवूड  युनिव्हर्सिटीच्या उद्घाटनाचा सोहळा  संपन्न झाला. मा. उपराष्ट्रपती श्री.व्यंकय्या नायडू यांनी   मा .सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या भारतातील या सर्वोत्तम युनिव्हर्सिटीकरीता शुभेच्छा दिल्या. 
या प्रसंगी कोकणचे सुपुत्र श्री.सुरेशजी प्रभू यांनी येणाऱ्या काळात राष्ट्रनिर्मितीसाठी युवा पिढी घडवायची असेल, तर त्याचा सर्वांगीण विकास होण्याकरीता केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर विद्यार्थ्याना व्यक्तिमत्व विकास व उचित कौशल्य देणे, ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

अमेरिकेतील अनेक युनिव्हर्सिटीमध्ये जगातील सर्वोत्तम शिक्षण मिळते या कारणानेच अमेरिका ही मुख्यत्वेकरून उच्चतम शिक्षण देणाऱ्या युनिव्हर्सिटीस चा देश अशी अमेरिकेची ओळख झालेली आहे. परंतु मूलतः भारत हाच शैक्षणिक गुरु होता व म्हणूनच भारतातील सर्वोत्तम युनिव्हर्सिटी म्हणून रिसीवूड युनिव्हर्सिटी हे कार्य करेल, असा आत्मविश्वास श्री.सुरेशजी प्रभू यांनी व्यक्त केला.

आपल्या कोकणाचे सुपुत्र भारताच्या इतक्या मोठ्या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम युनिव्हर्सिटी उभी होत असतानाच याचा पुढील काळात कोकणातील युवकांना देखील चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण घेण्यासाठी निश्चितच संधी मिळणार आहे. 

या संपूर्ण कार्यक्रमात कोकणचे सुपुत्र श्री.सुरेश प्रभुजी यांच्याविषयी देशातील अनेक शैक्षणिक संस्था, युनिव्हर्सिटीज व उद्योग क्षेत्रातील मान्यवर यांनी आदरपूर्वक अभिमानास्पद वक्तव्य करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच देशातील सर्वोत्तम युनिव्हर्सिटी उदयास येत असल्याचे समाधान व्यक्त केले आहे. 

कोकणचे सुपुत्र श्री.सुरेश प्रभू यांच्या पुढे अनेक मान्यवर नतमस्तक होऊन आदर व्यक्त करत होते. इतकेच नव्हे तर श्री.सुरेश प्रभू यांनी संस्थेसाठी केलेलं मार्गदर्शन देखील अतिशय प्रेरणादायी होते. 

श्री .सुरेश प्रभू यांनी रिशिवूड युनिव्हर्सिटी चे कुलगुरू पद स्वीकारून कोकणच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा प्राप्त केला आहे...




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.