35 वर्षांनंतर किर्लोसमध्ये अवतरली गंगामाता

● किर्लोसमध्ये अवतरली गंगामाता

● तब्बल 35 वर्षांनी अवतरली गंगामाता

● गंगा अवतरणाने जाग्या झाल्या जुन्या आठवणी


किर्लोसमध्ये अवतरली गंगामाता

मालवण तालुक्यातील किर्लोस गावठाणवाडी येथील डेरवण येथे गंगेचा उगम झाला असून गंगेच्या दर्शनासाठी परिसरातील गावातील भाविकांची रीघ लागत आहे. तब्बल ३५ वर्षानंतर किर्लोस गावच्या गावठणवाडीतील डेरवण येथे ही गंगा अवतीर्ण झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

तब्बल 35 वर्षांनंतर अवतरली गंगा

किर्लोस गावात डेरवणे गंगेचे धरण म्हणून फार प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे. गंगेचा उगम तब्बल ३५ वर्षानी होत आहे. गेले १० ते १२ दिवस गंगेचे पाणी वाहत आहे. दरम्यान या गंगास्थळी किर्लोस गावची देवराठी गंगा मातेच्या भेटीसाठी रविवार १९ डिसेंबर रोजी जात असून २१ डिसेंबरपर्यंत थांबणार आहे. 

मालवण तालुक्यातील किर्लोस गावात गंगा प्रकट झाल्याचे समजल्यावर अनेक भाविकांनी भेट देत गंगा मातेचे दर्शन घेतले आहे. गंगा उगमाची माहिती समजताच गंगेच्या दर्शनासाठी भाविकांनी या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.