श्रीगुरुलीलामृत आणि शंकर गीतेचा पुन्हा अमृतानुभव

● 'श्रीगुरुलीलामृत' व श्रीशंकभक्तांचे गुरुचरित्र - 'शंकर गीता' या दिव्य ग्रंथांच्या पुनःर्मुद्रित प्रतींचे प्रकाशन संपन्न

श्रीस्वामी समर्थमहाराजांचे एक प्रमुख शिष्य व श्री स्वामीसुतमहाराजांचे सहकारी श्रीमत्परमहंस ब्रह्मानंद स्वामीकुमार यांनी स्थापिलेली कोल्हापूर श्रीस्वामी समर्थ गादी, या पवित्र स्थानावर वामनबुवा ब्रह्मनिष्ठ लिखित-'श्रीगुरुलीलामृत" ५५ अध्यायी पोथीचा सार्थ भावानुवाद स्वरुपातील ग्रंथ, तसेच 'श्री शंकरभक्तांचे गुरुचरित्र - श्री शंकर गीता' या दिव्य ग्रंथाच्या पुनःप्रकाशित प्रतीचे प्रकाशन संपन्न झाले. 

'श्रीगुरुलीलामृत' ग्रंथ हा श्रीस्वामींच्या समस्त भक्तांचे श्रीगुरुचरित्र होय. श्रीस्वामीरायांच्या आज्ञेने हा प्रासादिक ग्रंथ वामनबुवांनी लिहिला. कालपरत्वे या ओवीबद्ध पोथीचा भावानुवाद करणे आवश्यक ठरल्याने हा भावानुवाद श्रींच्या प्रेरणेने केला आहे. भावानुवाद लेखनकर्ता - संजय नारायण वेंगुर्लेकर.

'श्रीशंकरभक्तांचे गुरुचरित्र - श्रीशंकर गीता' या ग्रंथाचा भावानुवाद लिहिण्याचा आरंभ वेंगुर्ल्याचे श्रीस्वामी समर्थ शिष्य श्री आनंदनाथमहाराजांच्या समाधीवर त्यांच्याच प्रेरणेने झाला. या ग्रंथात उल्लेखित सोळा शंकरशिष्य परिवाराला भेटी दिल्या असता शंकरमहाराजांच्या अधिक रोचक अंगाचे  दर्शन घडले. ग्रंथात उल्लेखित वृद्धेश्वर- म्हातारदेव रुपी श्रीस्वामी समर्थ, कानिफनाथांची मढी, शंकरमहाराजांनी समस्त भक्तांकरिता जमिनीतून वर काढलेले शंकरेश्वर आदी स्थानांची माहितीही नाविन्यपूर्ण आहे.

दोन्ही ग्रंथाचे मूल्य प्रत्येकी ५००/- रु. आहे. आपण या ग्रंथांचा सर्वदूर प्रचार करावा. समस्त भक्तगणांना या ग्रंथउपलब्धीची माहिती कळवावी.

|| श्रीस्वामी समर्थ ||
- संजय नारायण वेंगुर्लेकर

ग्रंथ नोंदणीसाठी - ९८६९१११८५०

धनंजय मेंदरकर, कोल्हापूर- ९५८८६७४६३९
संजय नारंगीकर-
९३२२५६७४००
अनिल आयरे, ठाणे-
९८२१७७६३८९
कल्पेश सकपाळ, पनवेल- ९०२९४००००२
बाळ हनवते, पुणे
९८२२३०३६६०
अण्णा तापकीर, दादर, मुंबई- ९९२०३१५७३९
निलेश साळवी, चिपळूण- ९५२७६८०७०१

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.