नेव्हिगेशन ॲप सेवा चालकांना आगामी अपघात प्रवण क्षेत्रे, स्पीड ब्रेकर्स, तीक्ष्ण वक्र आणि खड्डे यासह इतर धोक्यांबद्दल व्हॉइस आणि व्हिज्युअल अलर्ट प्रदान करते. देशातील रस्ते अपघातांमुळे होणारे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या योजनेचा हा एक भाग आहे.

देशात सातत्याने द्रुतगती मार्ग आणि महामार्ग बांधले जात आहेत. अनेक कार्यान्वितही झाले आहेत. तर काहींचं वेगाने काम सुरू आहे. अशातच रस्त्यावर गाडी चालविणाऱ्या लोकांची सुरक्षा लक्षात घेता एक फ्री-टू-युज-नेव्हिगेशन ॲप लाँच करण्यात आलं आहे. याला मूव्ह (MOVE) असं नाव देण्यात आलं आहे. यामुळे रस्त्यांवर चालणाऱ्या लोकांना अपघाताच्या धोक्यांबाबत अलर्ट मिळणार आहे. यात अनेक प्रकारची रोड सेफ्टी फीचर्सही देण्यात आली आहे.