●आता रेल्वेतही महिलांसाठी स्वतंत्र राखीव सीट
●भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय..!
रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मोठी बातमी आहे.. रेल्वेप्रवास करताना सीट मिळेल की नाही, याची चिंता आता महिलांना करावी लागणार नाही.. बस-मेट्रोच्या धर्तीवर रेल्वेतही महिलांसाठी राखीव सीट असणार आहेत..
भारतीय रेल्वेने महिलांच्या आरामदायी प्रवासासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये राखीव बर्थसह अनेक सुविधा सुरू केल्या आहेत..लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये स्लीपर क्लासमध्ये 6 बर्थ आरक्षित केले जातील. गरीब रथ, राजधानी, दुरांन्तोसह संपूर्ण वातानुकूलित एक्स्प्रेस गाड्यांच्या थर्ड एसी कोचमध्ये महिलांसाठी 6 बर्थ आरक्षित असतील..*
प्रत्येक स्लीपर कोचमध्ये 6 ते 7 लोअर बर्थ, वातानुकूलित 3AC डब्यांमध्ये 4 ते 5 लोअर बर्थ आणि ज्येष्ठांसाठी वातानुकूलित 2AC डब्यांमध्ये 3 ते 4 लोअर बर्थ. ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील महिला, तसेच गर्भवतींसाठी डब्यांच्या संख्येच्या आधारे आरक्षण दिले आहे.
◆ सुरक्षेसाठी 'मेरी सहेली'
रेल्वेस्थानके, रेल्वेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने गेल्या वर्षी 'मेरी सहेली' उपक्रम सुरू केला होता. 'पोलिस' आणि 'सार्वजनिक सुव्यवस्था' हे राज्याचे विषय असले, तरी प्रवाशांना रेल्वे संरक्षण दल व जिल्हा पोलिस चांगली सुरक्षा देतील, असे ते म्हणाले.