दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'अत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. अशाच दत्त महाराजांच्या कणकवलीमधील सुवर्ण रूपाची ही दर्शनगाथा
श्री दत्तात्रेय यांची ही सुवर्ण मूर्ती अलौकिक आहे. ही सुवर्णदत्त मूर्ती कणकवली जानवल, कृष्णनगरी येथे बंगला नं 31 श्री मोहिते, यांना खोदकाम करताना 3.5 फुटावर जमिनीत सापडली. पूर्णतः सोन्याची असलेली ही स्वयंभू दत्तात्रयांची मूर्ती एका हाताने उचलत नाही एवढी जड आहे, पण या सुवर्ण दत्तात्रेय मूर्तीची विशेष गोष्ट म्हणजे ही मूर्ती वजन काट्यावर जर ठेवली तर तिचे वजन '0' येते. विज्ञानाच्या काठिण्य पातळीला हलका बनवणारा हा अचंबित करणारा प्रश्न आहे.
दर गुरुवारी अभिषेक आणि दर्शनाला गेलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेता येतो, तसेच भक्तांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या तिथे पूर्ण होतात व त्याची सर्वांना प्रचिती आहे आणि ख्याती ही आहे.