मुंबई शिक्षक विकास मंडळाचे शिक्षक महायुवा संमेलन संपन्नआ. प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती : तळेरे गावचे सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांचे दरेकरांकडून कौतुक


कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आयोजित मुंबई आणि आसपासच्या विभागातील शिक्षक बांधवांसाठी आयोजित भव्य युवा महासंमेलन पार पडले. या संमेलनाचे आयोजन शिक्षक मंडळाचे कार्यकारणी सदस्य आणि तळेरे गावचे सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांनी केले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. 

या कार्यक्रमांमध्ये 1600 हून अधिक शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि आपल्या विविध समस्या, विविध प्रश्न याबाबतची निवेदने कार्यकारणी मंडळाकडे सादर केली. 

 सदर कार्यक्रमांमध्ये शिक्षकांच्या दैनंदिन जीवनचर्येमधील विविध प्रश्न, समायोजनाबाबतचे प्रश्न, वेतन, भत्ते, राष्ट्रीय शिक्षण धोरण इत्यादी बाबतीत सखोल चर्चा झाली. शिक्षक बांधवांसोबत आम्ही सदैव उभे आहोत आणि त्यांच्या प्रत्येक समस्येला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक वचन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारणी सदस्य डॉ. विशाल कडणे यांनी दिले. 

या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. शिक्षण हा देशाच्या व्यवस्थेचा मुख्य कणा असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे. आपल्या संभाषनामध्ये बोलताना आ प्रवीण दरेकर म्हणाले कि डॉ विशाल कडणे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक चळवळीचे काम उत्तम सुरु असून शिक्षक बांधवांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ दाखवत असलेल्या तत्परतेबद्दल ते कौतुकास प्राप्त आहेत. सदर कार्यक्रमास दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक श्री किरण शेलार यांनी महत्वाचे मार्गदर्शक केले.

सदर कार्यक्रमात विविध महत्त्वपूर्ण मागण्यांवर चर्चा झाली. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी आणि नंतर सेवेत रुजू झालेलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्ववत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, नेमलेल्या अभ्यासगटाने केलेल्या दि. ८५-२०२० च्या शिफारिशी मान्छ करून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० वर्षांची आश्वासित प्रगति योजना तात्काळ लागू करावी, शिक्षकांसाठी कॅशलेस मेडीक्लेम योजना लागू करावी, जाचक अटी रद्द करून सामान्य व तांत्रिक शाळांचे सर्व पात्र शिक्षकांना सरसकट निवडवेतनश्रेणी मान्य करावी, मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरणे, मुंबई महानगर पालिका माध्यमिक शिक्षण विभागात १ नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक झालेल्या सर्व शिक्षकांचे भविष्य निर्वाहनिधीचे खाते सुरु करून त्यांना तात्काळ डी.सी.१ लागू करावी, प्रत्येक शाळेत कला, क्रीडा व संगीत शिक्षकांची पदे पूर्वीप्रमाणे पुनर्स्थापित करावी, समुपदेशकांना शाळेत समुपदेशक पद देऊन त्यांना पूर्वीप्रमाणे वेतनवाढ मिळावी, रात्र - शाळांना पूर्ण वेळ शाळेचा दर्जा मिळावा व मुख्याध्यापकांप्रमाणे लिपिक व शिपाई पद पूर्ण वेळ करण्यात यावे, अशासकीय अनुदानित सामान्य व तांत्रिक शाळांमधील शिक्षकांचे सेवानिवृतीवेतनाचे प्रस्ताव रिकव्हरी किंवा तत्सम कारणावरून प्रलंबित न ठेवता कमाल एक महिन्याच्या आत मान्य करण्यासंबधीचे कायम स्वरूपाचे शासन आदेश निर्गमित व्हावे, वर्ग ६ ते ८ ला शिकवणाऱ्या सर्व प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी.

सदर अधिवेशनात आ शाम सावंत, डॉ गजानन रत्नपारखी, पराग शैक्षणिक संकुलाचे संचालक बाळकृष्ण बने शेठ, विजय कडणे, राजेश सातघरे, संजय पितळे, मनीष शाह, मंगल शाह, डॉ शिवम सिंग पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सिद्धेश कदम यांनी केले. कार्यक्रमादरम्यान व्यक्तिमत्व विकास आणि अध्यात्मकडून शास्त्राकडे ह्या विषयावर उपस्थित शिक्षकांना स्वामीनारायण समाजाचे स्वामी भक्तीप्रिय स्वामी यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक व्यक्तिचे वय कितीही झाले तरी तो मनामधून युवाच असतो, फक्त आपल्याला त्याच्या मनातला युवक बाहेर काढता आला पाहिजे, हयाच संकल्पनेतून कार्यक्रमाचे नाव युवा संमेलन ठेवण्यात आले आहे, असे आयोजक डॉ विशाल कडणे यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.