◆ कुडाळ मालवण विधानसभा आमदार वैभव नाईक वाढदिवस विशेष
'निष्ठा' हा एक शब्द किंवा संकल्पना नसून ते एक मोजमापाच्या पद्धतीतील परिमाण आहे. निष्ठा ही नेहमी संघर्षाच्या काळात प्रसंगी स्वतःचे रक्त वाहून एकाच ध्येयाप्रती दिलेली आहुती असते. काळानुसार आणि वेळेनुसार सोईप्रमाणे सोंगे बदलणारे अनेक नेते सध्याच्या जगात पावलोपावली भेटतात, पण प्रसंगी स्वतःवर झालेला जीवघेणा हल्ला परतवून लावून ए.सी.बी. आणि ईडी सारख्या संस्थाना देखील पाणी चारणाऱ्या वैभव नाईक यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती असलेली निष्ठा ही एक मोजता न येणारे परिमाण आहे.
आज कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस, वर्षभरात शुभेच्छा देण्यासाठी आणि कौतुकाचे चार शब्द लिहिण्यासाठी या एका दिवसाची प्रत्येक जण वाट बघत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्षमय योद्धा म्हणून आमदार वैभव नाईक यांची ओळख झाली आहे. संघर्ष हा जिवनात सुरुवातीपासून आमदार वैभव नाईक यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात मोठ मोठे नेते ईडी, एसीबी यंत्रणांना बळी पडून सत्तेमध्ये सामील होत असताना आमदार वैभव नाईक मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती आपली असलेली निष्ठा किंचितसुद्धा ढळू दिली नाही. आज संपूर्ण भारत देशामध्ये हुकुमी एकाधिकारशाही विरुद्ध जर कोणी आवाज उठवित असेल तर त्यात उद्धव साहेबांचे नाव अग्रक्रमांकावर आहे, मी तर म्हणेन "आमदार वैभव नाईक साहेबांसारखे निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांसोबत आहेत म्हणूनच उद्धव साहेब धिरोदात्तपणे या हिटलरशाही विरोधात लढत आहेत".
आयुष्यात लाखो, करोडो पैशांची आमिषे, मंत्रिपदाची आमिषे, केंद्रीय यंत्रणांचा दबाव, कष्टाने उभे केलेल्या संपत्तीची मोजमापे, प्रसंगी पक्षांतर करण्यासाठी टाकलेले दबाव झुगारून संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात एक आदर्श प्रस्थापित करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांचा आज वाढदिवस, जीवनात विशिष्ठ उंची गाठेपर्यंत सर्वांनाच संघर्ष करावा लागतो. पण एकदा अपेक्षित उंची गाठली की तुमच्या समस्या ती उंचीच सोडवते. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार वैभव नाईक या नावाचा आदर्श निर्माण झाला आहे. निश्चितच आज च्या स्तर घसरलेल्या राजकारणात आमदार वैभव नाईक यांच्यासारखी नेतेमंडळी आहेत म्हणून युवकांच्या सुसंस्कृत राजकारणाच्या आशा जिवंत आहेत.
अशा या निष्ठावंत व लढवय्या आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा