CVIGIL Application चा पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी तुम्हा सर्वांनी मोठ्या प्रमाणात वापर करायला हवा, तुम्ही तुमचे दैनंदिन कार्य करताना जर एखादी कोणत्याही स्वरूपाची आचारसंहिता उल्लंघनाची गोष्ट उदा.जातीय तेढ निर्माण करणारे भाषण, शस्त्र प्रदर्शन, पैसे वाटप, अवैध बॅनर,
बक्षीस वाटप व इतर अवैध गोष्टी ज्या मुक्त निवडणुकांवर प्रभाव पाडू शकतील या गोष्टी जर तुमच्या निदर्शनास आली तर तुम्ही या ॲप्लिकेशन द्वारे निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करू शकता व ही तक्रार निवडणूक आयोग खूप खूप गांभीर्याने घेते. या तक्रारींचे निवारण १०० मिनिटांमध्ये करणे बंधनकारक आहे
तुम्ही आचारसंहिता भंगाच्या तक्रार तुमची ओळख लपवून (Anonymous) व ओळख उघड करून अशा दोन्ही माध्यमातूनही करू शकता, जर ओळख लपविली तर तक्रारींचे निरसन होईल पण त्याबद्दल तुम्हाला ECI कडून त्याबद्दल काही reply प्राप्त होणार नाही.
जर ओळख उघड करून तक्रार केली तर तुम्हाला तुमच्या तक्रारींवर काय कार्यवाही केली गेली हे ECI कडून १०० मिनिटांच्या आत तुम्हाला कळविले जाईल. सर्व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ECI कडून याविषयी सक्त सूचना आहेत.
हे अँप्लिकेशन वर तुम्ही आचारसंहिता उल्लंघन तक्रारीसंबंधी फोटो, व्हिडिओ व ऑडिओ असे पुरावे अपलोड करू शकता व यावेळी या app कडून तुमचे location तुमच्या परवानगीने capture केले जाते व याच location वर जवळील Flying Squad Team (FST) तक्रार निवारणासाठी पोहचते.
निवडणूक आयोगातर्फे प्रत्येक विधानसभा मतदार संघात वेगवेगळ्या ठिकाणी Flying Squad Team(FST) या स्टॅन्ड बाय मोड वर ठेवल्या गेल्या आहेत. तक्रार केल्यानंतर २० मिनिटांमध्ये जवळील FST जागेवर पोहचते व या तक्रारींचे निरसन करून निवडणूक आयोगाला त्याचा अहवाल पाठविते.
आगामी लोकसभा निवडणुकीत या CVIGIL Application चा पारदर्शक वापर करुन आपण लोकशाही समृद्ध करूया !