पर्यटकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टुरिझम पोलीस संकल्पना राबविण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वळसे-पाटील यांनी दिले आहेत.
सावंतवाडी संस्थान काळापासून असलेल्या जिल्हा कारागृह येथे येरवडा जेल टुरिझम प्रमाणे जेल टुरिझम सुरु करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत
काय आहे जेल टूरिझम …?
कारागृहातील ऐतिहासिक स्थळे दाखवून, त्या काळच्या घटनांचे साक्षीदार होण्यासाठी तसंच त्यावेळची रोमांचकता अनुभवण्यासाठी आणि त्यातून प्रेरणा मिळावी, या हेतूने राज्य सरकारने महाराष्ट्रातील कारागृहांत ‘जेल टूरिझम’ सुरु करण्याची घोषणा केली.